मुंबई : 4.66 कोटींचा ड्रग्ज पोलिसांनी पकडला

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी सेलची कारवाई
Drugs
DrugsSakal

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी सेलने गुरुवारी (ता. २४) ४.६६ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या डोंगरी येथील आशिकाली पोईसरवाला (वय ३३) या तरुणाला अटक केली. एएनसीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, हे ड्रग्ज राज्याबाहेरून आणण्यात आले होते आणि आरोपी त्याची विक्री मुंबईत करत होता.

आरोपी आशिकाली पोईसरवाला हा डोंगरी येथील नवरोजी हिल रोड येथे भाड्याने राहतो. एएनसीच्या आझाद मैदान युनिटला डोंगरी भागात काही व्यक्ती एमडी ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी पोईसरवाला भायखळा येथील क्लेअर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे जवळपास ७०५ ग्रॅम एमडी सापडले; तर एएनसी पथकाने त्याच्या डोंगरी येथील घराची झडती घेतली. घरातून २.४०५ किलो एमडी सापडले. पोईसरवाला याला शुक्रवारी (ता. २५) न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी २०२१ मध्ये, पोईसरवाला याला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो जामिनावर बाहेर होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com