बनावट दस्तऐवजांच्या आधारे अमली पदार्थांची तस्करी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई - एक हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आरोपींनी बनावट दस्तऐवज बनवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे ही कलमेही लावण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे फेंटानिल या प्रतिबंधित रसायनाची तस्करी करण्यात येत होती.

अमली पदार्थविरोधी पथकाने १००० कोटींचे १०० किलो फेंटानिल जप्त केले होते. ते मुंबईतून मेक्‍सिकोला पाठवण्यात येणार होते. अमेरिकेत बंदी असलेल्या आणि हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या फेंटानिल अमली पदार्थाची मुंबईतून तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्याला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून अमली पदार्थविरोधी पथक आणि पोलिसांनी छापा टाकून सलीम ढाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, धनंजय सरोज यांना अटक केली होती.

Web Title: Drugs Smuggling by Bogus Stamp Crime