शेवग्याची शेंग १० रुपयांत

शेवग्याच्या शेंगा.
शेवग्याच्या शेंगा.

पाली (वार्ताहर) : आरोग्यवर्धक भाजी म्हणून शेवग्याची ओळख आहे. त्यामुळे तिला रायगड जिल्ह्यातील ठिकठिकणच्या बाजारात नेहमीच मोठी मागणी असते; परंतु गृहिणींनी काही दिवसांपासून ती खरेदीत आखडता हात घेतला आहे. त्याला कारण आहे, तब्बल पाचपटीने वाढलेला भाव. गेल्या वर्षी पाच शेंगांची जुडी १० रुपयांत मिळत होती. यंदा एका शेंगसाठी १० रुपये मोजावे लागत आहेत. 

वातावरणातील बदलांमुळे यंदा शेवग्याच्या झाडांना खूपच कमी बहर आला आला. त्यामुळे बाजारात त्यांची आवक खूपच मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यातील काही भाजीवाले पुणे मंडईतून शेंगा आणतात. मात्र तेथेच शेंगांची किंमत अधिक असल्याने भाववाढ झाली आहे. 

शेवग्याच्या शेंगा खूप रुचकर आणि आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी असते. काही दिवसांपासून त्या महागल्या आहेत. त्यानंतरही आवर्जून खरेदी करत आहे, असे पालीतील रहिवाशी जगन्नाथ म्हात्रे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 
याबाबत जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले की, वातावरण बदलामुळे शेवग्याच्या शेंगांचा बहर आला नाही. या झाडाला वर्षातून दोनदा बहर येतो. दुसरा बहर लवकरच सुरू होईल.

आरोग्यवर्धक भाजी 
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामिन ‘सी’ असते. ज्यामुळे थकवा दूर होतो. कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. पोटॅशियम असते, त्यामुळे हृदयरोगांपासून बचाव होतो. यात फायबर्स जास्त असतात. लोह असते. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. झिंक, व्हिटामिन ‘ए’ सुद्धा असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन कमी करण्यासही मदत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com