सुकामेवा गिफ्टच्या विक्रीत 50 टक्के घट 

सुकामेवा गिफ्टच्या विक्रीत 50 टक्के घट 


मुंबई: दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सुकामेव्याला मागणी असते. त्याचबरोबर सुकामेवा आणि चॉकलेट्‌सची गिफ्ट पॅकेट्‌स भेटवस्तू म्हणून दिली जातात.

परंतु यावर्षी सुकामेवा आणि चॉकलेट्‌सच्या गिफ्टच्या विक्रीत 50 टक्के घट झाली आहे. मंदीमुळे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी गिफ्टसाठी आखडता हात घेतला. त्यामुळे माल असून मागणी नाही अशी स्थिती महात्मा ज्योतिबा फुले मंडई आणि मस्जिद बंदर येथे बाजारपेठेमध्ये ओढावली आहे.

सुकामेवाचे आताचे सर्वसाधरण दर किलोप्रमाणे 

काजू - 800 
बदाम - 750 
पिस्ता - 1200, 
पिस्ता (सोललेले)- 2000 
अंजीर - 1200 
अक्रोड - 1200 
जरदाळू - 1000 
खजूर वेफर्स - 680 
खजूर ड्रायफुट बर्फी - 650 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com