दिवाळीत सुका मेवा महागला

दिवाळीत सुका मेवा महागला
दिवाळीत सुका मेवा महागला

नवी मुंबई : टिकाऊपणा व अन्य कारणांमुळे दिवाळीत मिठाईऐवजी सुक्‍या मेव्याची मागणी अधिक असते; मात्र, खारकेचे दर वधारल्याने दिवाळी यंदा चांगलीच महाग होणार आहे. माव्यासंबंधी भेसळीच्या घटना समोर येत असल्याने, मागील काही वर्षांत सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणात सुक्‍या मेव्याकडे मोर्चा वळवला. यामुळे दिवाळी दरम्यान त्यांची मागणी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

यंदा सुक्या मेव्याची मागणी जवळपास ३० टक्‍क्‍यांनी वाढली आहे; मात्र पाकिस्तानकडून आयात ठप्प झाल्याने, खारकेचे दर वधारले आहेत. त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या सुक्‍या मेव्यावर दिसून येत आहे.याबाबत सुक्‍या मेव्याचे घाऊक व्यापारी रमणिकभाई छेडा यांनी सांगितले की, मागील वर्षी खारकेचा घाऊक बाजारातील दर हा ९० ते १५० रुपये; तर किरकोळ बाजारात हाच दर २५० रुपये किलोच्या आसपास होता. भारतात उपलब्ध असलेली ८० टक्के खारिक पाकिस्तानहून येते; मात्र पाकिस्तानातून आयात बंद झाल्याने खारकेच्या किमती, ऐन दिवाळीत घाऊक बाजारात २५० ते ३८० रुपये किलोच्या घरात पोहोचल्या आहेत. याखेरीज दिवाळीतील मागणीमुळे बदाम, काजू, पिस्त्याच्या किमतीही वधारल्या आहेत. 

काश्‍मीरमधील समस्येमुळे अक्रोडची आवकही मंदावली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्‍मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईत सध्या परदेशातून अक्रोड आयात होत आहे. काश्‍मिरी अक्रोड साधारण ५०० ते ७०० रुपये किलो असतात. मात्र यंदा या अक्रोडची किंमत दिवाळी सुरू होण्याआधीच ६०० ते ८०० रुपये किलोवर गेली असून, किरकोळ बाजारात हा दर १००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बदाम, काजू, पिस्त्याच्या, खारका, अक्रोड यांच्या किमतीत भरघोस वाढ झाली  आहे. त्यातच पाकिस्तानातून आवक पुर्णपणे थांबली आहे. मात्र, दिवाळीत सुक्‍या मेव्याचे गिफ्ट पॅक देण्याची पद्धत हल्ली रूढ झाल्याने सुकामेव्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

दिवाळीत सुक्‍या मेव्याचे गिफ्ट पॅक देण्याची पद्धत हल्ली रूढ झाली. या गिफ्ट तयार करणाऱ्यांकडून सुक्‍या मेव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी अधिक व तुलनेने माल कमी असल्याने दरात वाढ झाली. गिफ्टचे पॅकेट हे १५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत आहे. 
- दिनेश कर्डिले, व्यापारी.


सुका मेवा    घाऊक बाजारातील दर (रुपयात)
                 २०१८    २०१९
पिस्ता    १२००-१६००    १६००-२२००
खारिक    ९०-१५०    २५०-३८०
काजू    ८००-१२००    ७००-११००
बदाम    ७००-१०००    ७००-८४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com