सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी देशातील सात कंपन्यांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. या प्रकल्पासाठी देशातील सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यांच्याकडील तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे का, याची पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक संकुलांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे सक्तीचे केल्यानंतर महापालिका सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. त्याला मुंबईतील सहा आणि अहमदाबादमधील एक अशा सात भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांच्याकडील तंत्रज्ञान तपासून कंत्राट देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी पुढील आठवड्यात या कंपन्यांची बैठक घेतली जाईल, असे सांगण्यात आले. 

Web Title: Dry Waste processing responds to seven companies in the country