स्वतःच्या घरात भाडोत्री राहण्याची "डीएसके'ची मागणी अमान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मुंबई : "घराला घरपण देणारी माणसं' अशी जाहिरात करणाऱ्या डीएसके कंपनीने स्वतःच्याच घरात भाड्याने राहण्यासाठी केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याबाबत अपील न्यायाधीकरणाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची फिर्याद उद्योगपती दीपक कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यासह मुंबईत व अन्यत्र करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांना अटकही झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डीएसके यांची मालमत्ता जप्त केली आहे.

त्यामधील पुण्यातील डीएसके व्हिला बंगल्यामध्ये 11 लाख रुपयांच्या भाडेपट्टीवर दोन महिने राहण्याची मागणी डीएसकेंच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, कायदेशीर तरतुदीमध्ये ही बाब बसत नाही, असे म्हणत न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आणि याचिका निकाली काढली. ईडीच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSK case