स्वस्तात मस्त कोरोना टेस्ट किट! 100 रुपयांत होणार चाचणी

corona virus antigen test
corona virus antigen test
Summary

फक्त 100 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या किटमधून रिपोर्ट तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आता ग्रामीण भागाला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये चाचण्यांवर अधिक भर द्यावा असं सांगण्यात आलं असून कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईत रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईतील स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने स्वस्तातलं किट तयार केलं आहे. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि सध्या असलेल्या रॅपीड अँटिजेन टेस्टसारखंच असणार आहे.

मुंबईतील या स्टार्टअपने तयार केलेलं टेस्ट किट हे खूपच स्वस्त आहे. यासाठी आयआयटी मुंबईचीसुद्धा मदत झाली आहे. टेस्ट किटची किंमत एका चाचणीसाठी 100 रुपये इतकी आहे. फक्त 100 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या किटमधून रिपोर्ट तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सेंटर फॉर ऑगमेटिंग वॉर विथ कोविड 19 हेल्थ क्रायसिसने जुलै 2020 मध्ये कोविड 19 रॅपिड टेस्ट किट तयार करण्यासाठी स्टार्टअपला आर्थिक सहाय्य केलं होतं.

corona virus antigen test
'भारतातील धोकादायक स्ट्रेनवर कोव्हॅक्‍सिन प्रभावी'

पतंजलि फार्माचे संचालक डॉक्टर विनय सैनी यांनी एसआयएनई, आयआयटी मुंबईसह स्टार्टअप सुरु केला. आणि त्यांनी 8 ते 9 महिन्यांतच संशोधन प्रयोगशाळा आणि विकास यासह उत्पादन निर्मिती केली. त्यासाठी आवश्यक परवाने मिळवण्यासाठी अर्जही केले. वेगवेगळ्या कोरोना सेंटरमध्ये असलेल्या प्रोडक्टचे मूल्यांकन आणि पडताळणी केली. त्यातून उत्पादनांमुळे उपचारात कितपत मदत होते आणि त्यात काय सुधारणा गरजेच्या आहेत याची माहिती मिळाली.

विनय सैनी यांनी कोरोना तपासणी किट तयार करण्याबाबत सांगितलं की, कोरोना रुग्ण आणि व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियनच्या नमुन्यांमध्ये आमच्या उत्पादनांची अंतर्गत पडताळणी करणं हा एक वेगळा आणि अद्भुत अनुभव होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या स्वॅबचा समावेश होता. यावेळी मुंबईतील वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर चाचणीवेळी कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम केलं.

corona virus antigen test
10-12 वर्षे तणावात गेली; सचिनने अनेक रात्री जागून काढल्या

नव्या किटच्या मदतीने अँटिजेन चाचणीला सुरुवात जून 2021 पासून करण्याचा प्लॅन आहे. रॅपिड टेस्ट 10 ते 15 मिनिटात होते. ग्रामीण भागात, डॉक्टरांचे क्लिनिक आणि जिथं पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक लॅब नाहीत अशा ठिकाणी या किटची मदत होणार आहे. किट स्वस्त असल्यानं परवडेल आणि कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com