जगभरातल्या खवय्यांसाठीपर्वणी! 'दुबई फुड फेस्टीवल' 26 फेब्रुवारी पासून सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जगभरातल्या खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या सातव्या "दुबई फूड फेस्टिवल'चे उद्घाटन बुधवारी (ता.26) दुबई शहरात (युएई) होणार आहे. दुबई फूड फेस्टिवल 14 मार्चपर्यंत सुरू असणार आहे.

मुंबई : जगभरातल्या खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या सातव्या "दुबई फूड फेस्टिवल'चे उद्घाटन बुधवारी (ता.26) दुबई शहरात (युएई) होणार आहे. दुबई फूड फेस्टिवल 14 मार्चपर्यंत सुरू असणार आहे.

Image may contain: 2 people, crowd, shoes and outdoor

विविध देशांमधील विविध खमंग, चविष्ट, लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी असलेल्या "दुबई फूड फेस्टिवल'साठी जगभरातून खाद्यप्रेमींची उपस्थिती असते. हा महोत्सव दुबई फेस्टिवल्स आणि रिटेल इस्टाब्लिशमेंट (डीएफआरई) यांच्यामार्फत आयोजित करण्यात येतो. डीएफआरईचे कार्यकारी अधिकारी अहमद अल खाजा म्हणतात, "जगभरातून येणाऱ्या पर्यटक आणि खाद्यप्रेमींचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी या महोत्सवात सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.'

Image may contain: 5 people, people sitting, table, indoor and food

या महोत्सवात दुबईतील 35 पेक्षा जास्त जगप्रसिद्ध रेस्टॉरंट 5 मार्च ते 14 मार्च दरम्यान एकत्र येणार आहेत. यावेळी जगप्रसिद्ध पुसस्कारविजेते बल्लावचार्य (शेफ) उपस्थित राहणार आहेत. 
"दुबई फुड फेस्टीवल'ची अधिक माहिती घेण्यासाठी https://www.visitdubai.com/en/dff या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Image may contain: 1 person, food


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Dubai Food Festival' resumes on 26 February