वरिष्ठांच्या मनमानीमुळे भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे सामुहिक राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मोखाडा - पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, मोखाडा तालुका भाजप व युवामोर्चाच्या पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी, सायदे जिल्हा परिषद गटात बैठका तसेच रणनीती आखण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे या गटात शिवसेनेला 600  मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या या गटातील सर्व भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी आणि युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पदाचा व सदस्यत्वाचा सामुहिक राजिनामा जिल्हाध्यक्षांना पाठविला आहे. या राजिनामा प्रकरणामुळे मोखाडा भाजपमध्ये भूकंप झाला असून, तालुका पदाधिकार्याचे धाबे दणाणले आहेत. 

शिवसेना आणि भाजप ने पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या पोटनिवडणूकीत भाजपचे राजेंद्र गावीत विजयी झाले आहेत. या पोटनिवडणूकीमुळे स्थानिक स्तरावरच्या राजकारणात सेना - भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आहे.

मोखाड्यातील सायदे गटावर भाजपचे वर्चस्व आहे. या गटातून भाजपचे दिलीप गाटे निवडून गेलेले आहेत. हे वर्चस्व कायम रहावे तसेच येथिल मताधिक्यात वाढ व्हावी, म्हणून येथिल पदाधिकार्यानी वरिष्ठांना येथे बैठका घेऊन रणनीती आखण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पोटनिवडणूकीत भाजप मागे पडली आणि शिवसेनेला मतांची आघाडी मिळाली. प्रचंड मेहनत करून ही केवळ वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि मनमानी मुळे भाजपला पिछाडीवर रहावे लागल्याचा, आरोप करीत सायदे जिल्हा परिषद गटातील सुमारे 39   पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं आणि युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामा जिल्हाध्यक्षांना पाठविला आहे. या राजीनामा प्रकरणामुळे मोखाडा तालुका भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

माझ्याकडे सायदे जिल्हा परिषद गटाची जबाबदारी देण्यात आली होती. या गटातील बुथचे नियोजन, कार्यकर्त्याच्या तसेच गावोगावी बैठका घेण्यासाठी येथील सर्व पदाधिकार्यानी, तालुका स्तरावरील नेत्यांना सुचवले होते. मात्र, या कडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. परिणामी ढिसाळ नियोजना मुळे या गटात भाजप मागे पडली आणि शिवसेनेला 600 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं व युवामोर्चाच्या कार्यकर्त्या नी सामुहिक राजीनामा दिला आहे.
- नामदेव पाटील, सरचिटणीस, भाजप मोखाडा तालुका .

Web Title: Due to the arbitrariness of senior officials, the collective resignation of BJP Coresponders