सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं(व्हिडिओ)

सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं(व्हिडिओ)

मुंबई- मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण आयोजकांनी मध्येच थांबवलं. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शनिवारी काल (ता.09) हा प्रकार घडला.

गॅलरीच्या कामकाजावर आपली परखड मतं मांडत असतानाच मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे, असे त्यांना सांगण्यात आलं. अखेर अमोल पालेकरांनी तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं, असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणा केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितले.
 

दरम्यान, भाषण करताना पालेकर यांनी कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com