मंडप परवानगीसाठी मुदतवाढीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - गणेशोत्सवाला 16 दिवस शिल्लक असताना अद्याप एक हजार मंडळे मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई महापालिकेकडे आलेल्या दोन हजार 37 अर्जांपैकी एक हजार 167 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. 170 मंडळांचे अर्ज येणे बाकी आहेत. हे लक्षात घेता अर्जासाठी पालिकेने पाच दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

यंदा मंडप परवानगीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करताना मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने मागील आठवड्यात समन्वय समितीसोबत बैठक घेतली. सुटीच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी पालिका कार्यालये सुरू ठेवली होती. अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत (ता. 28) आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिली. 

Web Title: Due to the demand for extension of mandap