Mumbai Rains : ठाण्यात मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजून 35 मिनीटांनी 4.58 मीटरची भरती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

ठाणे : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान, संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजून 35 मिनीटांनी 4.58 मीटरची भरती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट राहून स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने दूर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत. शहरात आज सकाळपासून जवळपास 100 मिमि पावसाची नोंद  झाली असून ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार महापालिकेचे अधिकारी त्या त्या परिसरात कार्यरत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains schools and colleges and close down in Thane