महागाईमुळे कामाठीपुरा येतोय तुर्भ्यात!

महागाईमुळे कामाठीपुरा येतोय तुर्भ्यात!

मुंबई : रिअल इस्टेटच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबईतील प्रसिद्ध वेश्‍याव्यवसाय कामाठीपुऱ्यातून स्थलांतरीत होत आहे. अनेक दशकांपासून कामाठीपुऱ्यात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वेश्‍यांनी वाढत्या महागाईमुळे तुर्भे आणि ठाणे परिसरात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्याची ओळख हळूहळू पुसली जाऊन तुर्भे हा नवा 'रेड लाईट एरिया' म्हणून ओळखला जात आहे.

दक्षिण मुंबई हा सर्वाधिक महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तू या परिसरात आहेत. लघु आणि मध्यम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात या भागात काम करतात. दक्षिण मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे ब्रिटीश काळापासून मुंबईत सुरु असलेला वेश्‍याव्यवसाय, तो देखील याच दक्षिण मुंबईत. मात्र सध्या वाढत्या महागाईमुळे दक्षिण मुंबईतील खर्च झेपत नसल्याने अनेकजण वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल परिसरात स्थलांतरित झाले. त्याचप्रमाणे अनेक वेश्‍यांना देखील वाढत्या महागाईमुळे कामाठीपुऱ्यात व्यवसाय करणे अवघड झाल्याने त्यांनी देखील इतरत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन वर्षांत कामाठीपुऱ्यातील अनेक वेश्‍यांनी तुर्भ्यात स्थलांतर केले आहे. रिअल इस्टेटच्या वाढत्या महागाईमुळे कामाठीपुऱ्यीाल खोल्यांचे  दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कामाठीपुऱ्यातील ज्या खोल्यांचे दर प्रतिमहिना दहा दजार रुपयांना आहे, त्याच तुलनेत तुर्भ्यात अवघ्या तीन हजार रुपयात खोल्या उपलब्ध आहेत. त्याच बरोबर कामाठीपुऱ्याच्या तुलनेत तुर्भ्यात पाण्याची आणि रस्त्यांची सुविधा देखील चांगली आहे. त्यामुळे कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळत असल्याचे वेश्‍या व्यावसाय करणा-या महिलांनी सांगितले आहे.


कामाठीपुऱ्यात देहविक्रीचा व्यवसाय करताना वाढत्या महागाईमुळे काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते. दोन-तीन वर्षांत खोल्यांचे दर वाढल्याने आम्ही तुर्भ्यांत स्थलांतर केले आहे. कामाठीपुऱ्याच्या तुलनेत या भागात व्यवसाय कमी असला, तरीही खर्च सुद्धा कमी आहे. त्यामुळे महिन्याला चार पैसे हाताला शिल्लक राहतात. - राणी, वेश्‍या व्यावसायिक.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com