नियमावलीच्या अभावामुळे घरकाम करणाऱ्यांवरुन सोसायट्यांमध्ये होतोय वाद...

वृत्तसंस्था
Wednesday, 17 June 2020

एकीकडे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामाध्यमातून दैनंदिन जनजीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न होत आहे

मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामाध्यमातून दैनंदिन जनजीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र त्यावरुनच आता काही ठिकाणी संघर्ष होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने प्लम्बर, इलेक्ट्रीशियन यांना काम करण्याची मुभा दिली, मात्र घरगुती कामे करणाऱ्यांचे काय यावरुन प्रत्येकजण वेगवेगळा अर्थ काढत आहे आणि त्यावरुन गृहनिर्माण सोसायटीत वाद सुरु झाले आहेत.

चीनचा हा तर आपल्याविरुद्ध कट..! भारतीय खेळाडूंनी केला आरोप

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरातील सोसायटीतील अध्यक्ष, सचिव तसेच कार्यालयातील अनेकांना घरात काम करणाऱ्यांना मंजूरी आहे का अशी विचारणा केली जात आहे. त्याचबरोबर मंजूरी नसल्यास कधीपासून देणार अशी विचारणा होत आहे. तर काही सोसायटीत एखाद्या घरी  काम करणाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार होत आहे.
 
दक्षिण मुंबईतील वाहतूक लवकरच सुरळीत..! 'या' पुलाचे काम झाले सुरु... 

घरी काम करणाऱ्यांबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण सोसायटी महासंघाने केली आहे. याबाबत मतभिन्नता असल्यामुळे सोसायटीतील वाद वाढत आहेत. महाराष्ट्रात एकंदर 1 लाख 10 हजार गृहनिर्माण सोसायटी आहेत. त्यातील 35 हजार मुंबईत तर 32 हजार ठाणे जिल्ह्यात आहेत. 

बलात्कारी आरोपीचे पलायन आणि पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; चक्क महामार्गावर रंगला थरार...

गृहनिर्माण सोसायटीत घरी काम करणाऱ्या प्रवेश देण्याचे ठरल्यास त्याबाबतचे नियम काय असावेत याचीही मागणी केली जात आहे. काही सोसायटीतील सदस्य नियम मोडून घरात घर काम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देत आहेत, त्यावरुन वाद होत आहेत. एवढेच नव्हे तर काहींनी पोलिसांतही तक्रार केलीआहे, पण काहींनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण वाढले नाही याकडेही लक्ष वेधले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to lackof rule and regulaton there are clashes in societies over the permission for maid