ऑनलाइन प्रक्रियामुळे उल्हासनगरात तूरडाळ नागरिकांच्या पदरात

दिनेश गोगी
रविवार, 12 ऑगस्ट 2018

उल्हासनगर :  शहरात 106 रेशन दुकाने आहेत. त्यांपैकी 99 दुकानांना 484 क्विंटल तूरडाळीचा साठा देण्यात आला आहे. 7 दुकानांना अद्याप तूरडाळ मिळाली नसून साठा येताच त्यांना तो वितरित केला जाणार आहे. तूरडाळ व इतर धान्य मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया हाताळली जात आहे. अंगठा घेतल्यानंतरच तूरडाळ सह इतर सर्व वस्तू दिल्या जातात. त्यामुळे तूरडाळ नागरिकांच्या पदरात पडत असून सावळ्या गोंधळाचा प्रश्नच उदभवत नाही. असा दावा शिधा वाटप अधिकारी जगन्नाथ सानप यांनी केला आहे. विशेष म्हणजे अंत्योदय, केसरी असे रेशनकार्ड धारकांना रेशनचा सर्व लाभ मिळत असतो.

उल्हासनगर :  शहरात 106 रेशन दुकाने आहेत. त्यांपैकी 99 दुकानांना 484 क्विंटल तूरडाळीचा साठा देण्यात आला आहे. 7 दुकानांना अद्याप तूरडाळ मिळाली नसून साठा येताच त्यांना तो वितरित केला जाणार आहे. तूरडाळ व इतर धान्य मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया हाताळली जात आहे. अंगठा घेतल्यानंतरच तूरडाळ सह इतर सर्व वस्तू दिल्या जातात. त्यामुळे तूरडाळ नागरिकांच्या पदरात पडत असून सावळ्या गोंधळाचा प्रश्नच उदभवत नाही. असा दावा शिधा वाटप अधिकारी जगन्नाथ सानप यांनी केला आहे. विशेष म्हणजे अंत्योदय, केसरी असे रेशनकार्ड धारकांना रेशनचा सर्व लाभ मिळत असतो. मात्र यावेळेस व्हाईट कार्ड धारकांनाही तूरडाळीचा लाभ मिळणार असल्याचे सानप यांनी सांगितले.

850 किलो तूरडाळ मिळाली आहे. त्यापैकी 500 किलो डाळ नागरिकांना वितरित केली आहे. डाळीचे एक किलोचे पॅकिंग असून किंमत 35 रुपये आहे. डाळीची क्वाॅलिटी चांगली असल्याने नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. कार्डावर जेव्हढे सदस्य आहेत, त्यांच्या मागणीनुसार डाळ देण्यात येत आहे. डाळ कमी पडण्याची स्थिती असून शिल्लक राहण्याचा प्रश्नच उदभवणार नाही. , अशी माहिती शांतिग्राम धान्य भंडार सहकारी ग्राहक संस्था या रेशन दुकानाचे चेअरमन जयकुमार केणी यांनी दिली.

593 पैकी 293 किलो तूरडाळ विक्री करण्यात आली असून 300 किलो तूरडाळ शिल्लक आहे. मात्र दुकानात गहू, तांदूळ, रॉकेल उपलब्ध नसल्याने उर्वरित नागरिक जोपर्यंत ह्या वस्तू दुकानात येत नाहीत तोपर्यंत तूरडाळ घेण्यास पुढे येत नाहीत. एकवेळ ऑनलाइन अंगठा दिला तर तूरडाळ केवळ मिळणार. बाकी वस्तूला मुकावे लागणार असल्याने ते प्रतीक्षा करत आहेत. ह्या वस्तू दुकानात येताच नागरिकांना वस्तूंसोबत तूरडाळ देखील देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्ड धारकांना दुकानाचा फोन नंबर संपर्काकरिता देण्यात आल्याचे 84 नंबरच्या दुकानाचे मालक सनी चैनानी यांनी सांगितले.

 

Web Title: Due to the online process tur dal of the citizens of Ulhasnagar