संमेलनामुळे साहित्यिकांना भेटण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - यंदाच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश येथून नामवंत व नवोदित लेखक, साहित्यप्रेमी साहित्यनगरीत आले आहेत. साहित्य संमेलनात नामवंत लेखकांच्या भेटी होतात, त्यांचे विचार ऐकल्यास प्रोत्साहन मिळते. याबरोबर व्हॉटसॲप, फेसबुकच्या माध्यमातून अनेकांच्या वेगवेगळ्या विषयांवर कविता व्हायरला होतात.

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - यंदाच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश येथून नामवंत व नवोदित लेखक, साहित्यप्रेमी साहित्यनगरीत आले आहेत. साहित्य संमेलनात नामवंत लेखकांच्या भेटी होतात, त्यांचे विचार ऐकल्यास प्रोत्साहन मिळते. याबरोबर व्हॉटसॲप, फेसबुकच्या माध्यमातून अनेकांच्या वेगवेगळ्या विषयांवर कविता व्हायरला होतात. त्यापैकी काही कवींची समक्ष कविता ऐकण्याची व त्यांना भेटण्याची संधी या साहित्य संमेलनात मिळते, म्हणून खास वेळ काढून साहित्य संमेलनाला आलो असल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली; तर काहींनी बहुजन, दलित साहित्यकांना हवे तसे स्थान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. याबरोबर ग्रामीण भागातील नवोदित कवींना निमंत्रण दिले जात नाही. त्यांना प्रोत्साहन म्हणून योग्य मानधन देण्याची मागणीही कवींनी केली. 

साहित्याची आवड असल्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनासाठी आलो आहे. येथे अनेक नामवंत साहित्यिकांची भेट झाली. मलाही कविता सादर करण्याची संधी मिळाली. साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळाले. त्याबरोबर नवोदित कवींची यानिमित्ताने मैत्री झाली. योग्य मानधन मिळाल्यास नवोदित कवींना प्रोत्साहन मिळेल.
- हनुमंत पडवळे,  मराठवाडा (उस्मानाबाद).

यंदाच्या साहित्य संमेलनात गर्दी झाली नाही; परंतु आलेले साहित्यप्रेमी हे दर्दी असल्याचे जाणवले. ग्रामीण भागापर्यंत साहित्य पोहोचावे, हा साहित्य संमेलनाचा उद्देश असतो; त्यामुळे ग्रामीण, दलित व बहुजनांना साहित्य संमेलनात सामावून घेणे आवश्‍यक आहे.
- एकनाथ इंगळे, विदर्भ (अकोला).

यंदाचे साहित्य संमेलन हे संमेलन असल्यासारखे जाणवत आहे. आयोजकांनी योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे ते मराठी साहित्याचे संमेलन निश्‍चितच झाले आहे. साहित्य संमेलनात हवा तो ग्रंथ, पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करता येते. त्यामुळे मी प्रत्येक साहित्य संमेलनाला जातो.
- प्रा. राधाकिसन मुंडे,  पश्‍चिम महाराष्ट्र (अहमदनगर).

गेल्या १८ साहित्य संमेलनांच्या तुलनेत यंदा गर्दी कमी जाणवत आहे. साहित्य संमेलनामुळे थेट लेखकाला, कवीला, विचारवंतांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे मी प्रत्येक संमेलनाला जातो. मात्र यंदाच्या साहित्य संमेलनात बहुजन, दलित, आदिवासी साहित्यिकांना हवे तसे स्थान मिळाले नसल्याची खंत आहे.
- प्रा. चिंतामण धिंदळे, पनवेल.

Web Title: Due to the opportunity to meet literary