लोकलहाल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

मुंबई -  मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पश्‍चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकात पाणी साचल्याने सकाळपासूनच वसईपुढील लोकल सेवा बंद करण्यात आली. मध्य तसेच हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला. पावसामुळे वसईपुढे पश्‍चिम रेल्वेची लोकल वाहतूक बंद करण्यात आल्याने दिवसभरात १५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या; तर ५० गाड्या विलंबाने धावल्या. पश्‍चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर रुळावर आली नव्हती.

कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. कुर्ल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक रडतखडत सुरू होती. अर्ध्या तासाच्या प्रवासाला अडीच तासांहून अधिक वेळ लागत होता. पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या २५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला. मानखुर्द स्थानकात पाणी साचल्याने दुपारी वाशी ते  सीएसएमटी लोकल सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. गोरेगाव-सीएसएमटी लोकलही वडाळ्यापर्यंत चालवण्यात आली. मानखुर्द-गोवंडीदरम्यान रुळांना तडे गेल्याने सायंकाळीही या मार्गावरील वाहतुकीला फटका बसला.

लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस, पुणे-कर्जत पॅसेंजर रद्द केली. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. पश्‍चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

Web Title: Due to the rains the traffic in Mumbai was affected