विलेपार्ले स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे, पश्चिम रेल्वे वाहतूक विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

गुरूवारी सांय़काळी विलेपार्ले स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत होती.

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील विलेपार्ले रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गुरुवारी पश्‍चिम रेल्वेच्या रात्रीच्या सत्रातील लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या.

गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड 15 मिनिटानंतर दूर करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र या बिघाडामुळे पश्‍चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सुमारे 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेकडून देण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to a technical breakdown in the Ville Parle station Western Railway delayed