नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाताना झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हाल

रविंद्र खरात
रविवार, 30 डिसेंबर 2018

शनिवार रविवार सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण बाहेर जाण्यासाठी निघालेल्या कल्याणकरांना आज रविवार (ता. 30) डिसेंबर रोजी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

कल्याण- शनिवार रविवार सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण बाहेर जाण्यासाठी निघालेल्या कल्याणकरांना आज रविवार (ता. 30) डिसेंबर रोजी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

सोमवार 31 डिसेंबर म्हणजे सन 2018 चा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज रविवार (ता. 30) दुपारनंतर कल्याणकर बाहेर पडले मात्र त्यांना शहरातील चार ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा आणि झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कल्याणकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

कोंडीचे जक्शन...
भिंवडी कल्याण शिळफाटा रोड वरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने 112 कोटी खर्च करून भिंवडी कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्ता करण्यात येणार असून आज कल्याण मधील पत्रिपुल परिसरात भव्य मंडप उभारला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने कडेकोट बंदोबस्त होता, कल्याणकरांची अपेक्षा होती की पालक मंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून शहरात वाहतूक कोंडी मुक्त असेल मात्र कल्याण पत्रिपुल ते सुचकनाका, पलावा ते काटई नाका, कल्याण मधील वालधुनी पूल, दुर्गाडी पूल, शहाड पूल, मुरबाड रोड, गोविंदवाडी रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक सहित नागरीकांना चांगलाच त्रास झाला यामुळे पत्रिपुल हे कोंडीचे जक्शन असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. 

31 डिसेंबरसाठी बाहेर पडलेले आणि शनिवार रविवार सुट्टीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई सहित कल्याण परिसरात ही कोंडी आज झाली असून प्रत्येक पॉईंटला वाहतूक पोलिस ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली.

Web Title: Due to traffic jam Facing problems