नागपुरची संत्री खावीशी वाटतीये, पंधरा दिवस थांबा!

नागपुरची संत्री खावीशी वाटतीये, पंधरा दिवस थांबा!
नागपुरची संत्री खावीशी वाटतीये, पंधरा दिवस थांबा!

नवी मुंबई : अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानाचा यंदा राज्यातील शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. परिणामस्वरूप, नागपुरी संत्र्यांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. आणखी पंधरा दिवसांनी नागपूरची ही संत्री बाजारात दाखल होतील, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी सध्या बाजारात गुजराती संत्र्यांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. 

संत्र्याचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्यामध्ये जीवनसत्व सीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी सर्वसामान्य नागरिक आवडीने खरेदी करतात. यंदा अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नागपुरी संत्र्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात गुजराती संत्रीच दिसत आहेत. परंतु येत्या पंधरा दिवसांत बाजारात हळूहळू संत्र्यांची आवक सुरू होईल, असे व्यापारी अनवर खान यांनी सांगितले. सध्या पंजाबवरून येणारा किन्नू संत्री देखील बाजारात उपलब्ध आहे. हा संत्रा आकाराने मोठा व रंगाने गडद नारंगी असला तरी चवीला आंबट आहे. त्यामुळे या संत्र्याला ग्राहकांची हवी तशी पसंती मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आकारावरून संत्र्याची किंमत ठरते. वाशी येथील घाऊक बाजारात रोज आठ गाड्यांची आवक होत असून, आठ डझनचा दर 150 रुपये आणि मोठ्या आकाराच्या संत्र्यांचा दर 1200 रुपये आहे; तर पंजाबी किन्नू संत्र्यासाठी 600 रुपये मोजावे लागत आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांना हा संत्री 60 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

यंदा अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नागपुरी संत्र्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात गुजराती संत्री आहे; परंतु येत्या पंधरा दिवसांत बाजारात हळूहळू संत्र्याची आवक सुरू होईल. 
- अनवर खान, व्यापारी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com