खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण; मनसेचा आंदोलनचा इशारा

दीपक हीरे
रविवार, 24 जून 2018

वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुपरिचित अशा वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळी गेल्या कित्येक दिवसांपासून खंड़ित वीज पुरवठा होत असून रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब होत असल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले असून येथील वीज पुरवठा सुरळत करावा अन्यथा तीनही गांव मिळून तीव्र ठिया आंदोलन करणार असल्याच्या इशारा येथील महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी वसई येथील महा वितरण अधीक्षक अभियंता याना एका निवेदना द्वारे दिला आहे

ठाणे जिल्ह्यातील सुपरिचित अश्या वज्रेश्वरी तीर्थक्षेत्र मध्ये महावितरण कडून वारंवार येथील वीज पुरवठा गेल्या कित्येक दिवसांपासून खंडित होत आहे. पाउसला सुरुवात होते न होते लगेच या भागातील वीज वारंवार खंड़ित होत असल्याने येथील आबाल वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी सह येथील पर्यटक देखील हैरान झाले आहेत. वीजे अभावी येथील हॉटेल व्यावसायिक तसेच विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहेत. या परिसरात रात्री चया वेळी वसई येथून वीज पुरवठा खंडित केला जातो, तसेच तारा तूटने, खम्बा पड़ने आदी कारण सांगून या तीर्थक्षेत्र मधील वीज पुरवठा वारंवार खंड़ित केला जातो. वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्र मध्ये वीज पुरवठा वसई येथून होतो. मात्र येथील वीज पुरवठा पावसल्यात सुरलित होत नाही ही शोकांतिका गेली अनेक वर्षा पासून आहे.

वज्रेश्वरी हा ग्रामीण भाग असल्याने येथील समस्या कड़े संभन्धित वीज विभाग दुर्लक्ष करीत असल्याने येथील ग्रामस्थना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने येथील ग्रामस्थ व शेतकरी ,कष्टकरी,आबाल वृद्ध, विद्यार्थी, याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच रात्री डास, गर्मी, विंचू साप यांच्या मुळे हैरानी होत आहे. दरम्यान असे पुरवठा होत असताना देखील येथील ग्रामस्था ना महावितरण कडून अवाच्या सवा वीज बिल येत असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे .येत्या आठ दिवसात या भागातील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास गणेशपुरी येथे ठिया आंदोलन करण्याचा इशारा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वज्रेश्वरी शाखा अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिला आहे

पावसाचे दिवस असल्याने काही तांत्रिक बिघाड विरार फाटा, शिरसाड येथे होतो,तसेच दुर्गम भागात पोल, व तारा व रोहित्र असल्याने रात्री बिघाड झाल्यास ते शोधन अवघड जाते, मात्र येत्या काही दिवसात वीज पुरवठा सुरळीत होईल.
- इरफ़ान शेख, कनिष्ठ अभियंता महावितरण गणेशपुरी

Web Title: due to waste electricity supply; MNS's movement alert