भीषण अपघातात डम्परचालकाचा मृत्यू

भीषण अपघातात डम्परचालकाचा मृत्यू

नवी मुंबई : उलवे येथून चेंबूर येथे जाणाऱ्या डम्परवरील नियंत्रण सुटल्याने सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे शनिवारी (ता. 9) पहाटे भीषण अपघात घडला. या अपघातात डम्पर उड्डाणपुलाला धडकून उलटा झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. 

ठार झालेल्या डम्परचालकाचे नाव मोहम्मद अख्तर इलियास खान असून, तो चेंबूर येथील एस. आर. नावाना ट्रान्स्पोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास मोहम्मद चेंबूर येथून मातीने भरलेला डम्पर घेऊन उलवे येथे रिकामा करण्यासाठी गेला होता. उलवे येथे मातीचा डम्पर रिकामा केल्यानंतर मोहम्मद अख्तर हा चेंबूर येथे जाण्यासाठी निघाला होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोहम्मद हा सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा उड्डाणपुलाजवळ आला असताना, त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनचालकाने कट मारला. त्यामुळे मोहम्मदचे डम्परवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा डम्पर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून उलटा झाला. जखमी डम्परचालका महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानुसार सानपाडा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com