डंपिंग ग्राउंडचा प्रश्नासाठी कल्याणकर उतरले रस्त्यावर

सुचिता करमरकर
सोमवार, 19 मार्च 2018

सामान्य कल्याणकर प्राथमिक सोयी सुविधांपासून लांब असल्याने आज अखेर न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला. बुधवारी (21 मार्च) डंपिंग ग्राउंडला भेट देऊन आपण या विषयावर काय करता येईल. त्यावर भाष्य करु, असे नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. 

कल्याण - जागरुक नागरिक संघटनेचे ढोल ताशा आंदोलन तसेच अनेक वर्ष प्रलंबित असलेला आधारवाडी डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सुटावा, यासाठी काढण्यात आलेल्या मुक मोर्चाने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांचे आज पालिकेत स्वागत झाले. मागील अनेक वर्षांपासून सामान्य कल्याणकर प्राथमिक सोयी सुविधांपासून लांब असल्याने आज अखेर न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला. बुधवारी (21 मार्च) डंपिंग ग्राउंडला भेट देऊन आपण या विषयावर काय करता येईल. त्यावर भाष्य करु, असे नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. 

अॉक्टोबरपासूनच जागरुक नागरिक संघटनेतर्फे सेवा नाही तर कर नाही या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. पालिका प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही काही काम न झाल्याने आज 'क' प्रभाग क्षेत्र कार्यालयाबाहेर ढोल ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले. टप्प्याने हे आंदोलन इतर प्रभाग कार्यालयांबाहेरही केले जाणार आहे. 

agitation

10 मार्चपासून सलग सहा दिवस जळत असलेल्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडने कल्याणकर नागरिकांना हैराण केले आहे. हे डंपिंग ग्राउंड बंद व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी एक संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने आज पालिका मुख्यालयावर मुक मोर्चा काढला. मोर्चाचे शिष्टमंडळ पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना भेटले. महेश बनकर, विशाल वैद्य, प्रभा निपाणे, कांचन कुलकर्णी यांचा शिष्टमंडळात समावेश होता. एकवीस मार्च रोजी आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर पाहणी करुन त्याबाबत नेमकी असलेली अडचण सोडवण्यासाठी काय करता येईल यावर आपण नागरिकांना माहिती देऊ असे आयुक्त बोडके यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. दहा वर्षापूर्वी या परिसरातील नागरिकांनी असे आंदोलन करुन प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हापासून आजपर्यंत आश्वासनाव्यतिरिक्त पदरी निराशाच पडल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

agitation

agitation

Web Title: dumping ground agitation kayan mumbai commissioner