तोतया पोलिसांना माटुंग्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - शाळेच्या 100 मीटर परिसरातील पान टपरीवाल्यांना ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तिघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. हर्षल भाटकर, दुर्गेश गुप्ता आणि प्रकाश प्रल्हाद ठोंबरे अशी त्यांची नावे आहेत. यातील हर्षल भाटकर (31) हा दादरच्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा असून त्याचा फूड एजन्सीचा व्यवसाय आहे; तर दुर्गेश गुप्ता (51) हा माहीम परिसरात राहणारा असून तो प्रॉपर्टी एजंटचे काम करतो आणि प्रकाश ठोंबरे (36) यांचा टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. 

धारावीच्या 90 फीट रोडवर राहणारे तक्रारदार आशीष पांडे यांची माटुंग्याच्या भंडारकर रोडवर बनारसी पानभंडार नावाची पानपट्टी आहे. पांडे यांच्या टपरीवर भाटकर, गुप्ता आणि ठोंबरे यांनी स्वत:ची ओळख ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी अशी सांगितली. त्यानंतर शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याने कारवाई टाळण्यासाठी पांडे यांच्याकडे 15 हजारांची मागणी केली. घाबरलेल्या पांडे याने तडजोडीअंती सहा हजार देण्याची इच्छा दर्शवली. त्यानुसार पांडेने लाचेचा पहिला हप्ता तीन हजार 700 रुपये तिघांना दिला. या तिघांवर संशय आल्याने त्यांनी माटुंगा पोलिस ठाण्यातील ओळखीच्या अधिकाऱ्यांना घटना सांगितली. त्यानंतर लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारताना तिघांना अटक केली आहे. 

Web Title: duplicate police arrested