Lockdown च्या काळात नागरिक डाउनलोड करतायत हे मोबाईल 'App'; काय आहे बरं हे ऍप्लिकेशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

Zoom हे मोबाईल ऍप्लिकेशन ५० करोडपेक्षा जास्त नागरिकांनी download केलं आहे. फक्त २८ MB च्या असणाऱ्या ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे या ऍपच्या मदतीनं तब्बल १०० लोकं एकाच वेळी व्हिडीओ कॉल करू शकतात.

मुंबई : नॉवेल कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील नागरिक सध्या घरीच आहेत. त्यात वेळ घालवायचं साधन म्हणजे सोशल मीडिया. लोकं सध्या घरीच राहून टिकटॉक व्हिडिओ बनवण्यात किंवा जुन्या मित्रांशी, नातेवाईकांशी Whatsapp वर बोलण्यात वेळ घालवत आहेत. मात्र या दोन्ही प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या ऍप्सना मागे टाकत एका अप्लिकेशनने डाउनलोडमध्ये बाजी मारलीय. सध्या सर्वजण वर्क फ्रॉम होम देखील करतायत, अशात हे ऍप्लिकेशन सर्वात जास्त हिट ठरतंय. या ऍप्लिकेशनचं नाव आहे 'झूम'. 'झूम' नावाच्या ऍप्लिकेशनचे प्ले आणि iStore वर सगळ्यात जास्त डाउनलोड आहेत.

मोठी बातमी - एचडीएफसी  ग्राहकांसाठी खुश खबर! वाचा ही महत्वाची बातमी

Zoom हे मोबाईल ऍप्लिकेशन ५० करोडपेक्षा जास्त नागरिकांनी download केलं आहे. फक्त २८ MB च्या असणाऱ्या ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे या ऍपच्या मदतीनं तब्बल १०० लोकं एकाच वेळी व्हिडीओ कॉल करू शकतात. सध्या भारतात लॉकडाऊन आहे त्यामुळे अनेक घरून काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या मीटिंग घेण्यासाठी या ऍप्लिकेशनचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात केला जातोय.

काही लोकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते  मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायला Zoom ऍप्लिकेशनचा वापर करण्यात येतोय.

मोठी बातमी - कोरोनाविरोधात ग्रामीण भागात  झटणाऱ्यांना राज्य सरकारकडून खुश खबर!

 

ZOOM Cloud Meetings - Apps on Google Play

या ऍप्लिकेशनचे काही विशेष फीचर्स:

  • या App वर एकाच वेळी १०० लोकांना व्हिडीओ कॉलवर बोलण्याची संधी मिळते.
  • या App चा यूजर इंटरफेस खूप सोपा आहे.
  • या zoom App मध्ये फ्रीमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा आहे.
  • या App मध्ये वन-टू-वन मीटिंगचाही पर्याय आहे.
  • या App मध्ये ४० मिनिटांच्या ग्रुप कॉलिंगचीही सुविधा आहे.

या App मुळे लॉकडाउनच्या काळातही लोकांना आपल्या प्रियजनांशी घरातच राहून छान संवाद साधता येतोय, बोलण्याची संधी उपलब्ध होतेय. त्यामुळेच Whatsapp आणि टिकटॉकला मागे टाकत Zoom हे App लोकांच्या पसंतीला पसंतीला उतरत आहे.

during lockdown period people are downloading zoom mobile app read full story

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during lockdown period people are downloading zoom mobile app read full story