Mumbai : पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे वाचले प्राण ; नैराश्यमुळे आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alertness Mumbai Police  young man suicide

Mumbai : पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे वाचले प्राण ; नैराश्यमुळे आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - कर्तव्य दक्षतेमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. अक्षय पवार पाटील असे तरुणाचे नाव असून नैराश्यमुळे आत्महत्येचा तरुणाने प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. अक्षय आत्महत्येच्या प्रयत्नांत असताना पोलिसांनी त्याला कर्जत येथून ताब्यात घेतले.

नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न

17 फेब्रुवारी शुक्रवारी संध्यकळी 7.38 वाजता अक्षय पवार पाटीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. या ट्विट मध्ये "मी आत्महत्या करत आहे. त्याआधी मला माझे अवयव दान करायचे आहेत.

मी लहानपणीच ठरवले होते की मी मृत्यूपूर्वी माझे शरीर दान करेन. करिअरमधील सतत अपयश हे आत्महत्येचे कारण आहे" असे म्हंटले होतें.

सोशल मीडियावर ट्विट व्हायरल होताच सदरची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हे शाखा, मुंबई यांचे नेतृत्वात गुन्हे शाखा कक्ष ५, कक्ष ३, कक्ष ९ व वेस्ट सायबर पोलीस ठाणे यांची संयुक्त पथके तयार करून तपास सुरू झाला

पोलिसांचा तपास

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या अक्षयबाबत पथकाने तात्काळ तांत्रीक विश्लेषण करून माहीती मोळा केली. सदर माहीतीचे आधारे पोलीस पथकाने अक्षयला कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.

अक्षय पवार पाटील २६ वर्षाचा असून याचेकडे विचारणा करता तो १२ वी सायन्स पास असून सध्या कामाच्या शोधात आहे. त्याने कोरोना काळात त्याचे वडीलांचे उपचाराकरीता च दैनंदिन गरजांकरीता वेगवेगळ्या खाजगी संस्थांकडुन कर्ज घेतले असून सदर कर्जाचे हफ्ते व घरखर्च भागवु शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याचा विचार करीत होता.

मरणापूर्वी त्याचे शारिरीक अवयव गरजू व्यक्तींना दान करावयाचे असल्याने त्याने सदरचे ट्विट केले असल्याचे सांगीतले.

सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे समुपदेशन करून त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले असून त्यास त्याचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याचेवर मानोसपचार करण्याबाबत त्याचे आईवडीलांना कळविण्यात आले आहे. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल त्याचे आईवडीलांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले आहेत.