
मेट्रोच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरून ई-बाईक सुविधा सुरू होणार आहे. दरम्यान, आता वर्सोवा मेट्रो स्थानकातून ही सेवा सुरू झाली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेप्रमाणे आता मेट्रो स्थानकावरून एका तासाला दोन रुपये भाड्याने ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (ता. 16) वर्सोवा मेट्रो स्थानकात या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकातून फेब्रुवारी महिन्यात ई-बाईकची सुविधा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे; तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वतीने मेट्रोच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरून ई-बाईक सुविधा सुरू होणार आहे. दरम्यान, आता वर्सोवा मेट्रो स्थानकातून ही सेवा सुरू झाली आहे.
मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
पर्यावरणास अनुकूल आणि साधासोपा प्रवासी मार्ग, प्रवासी जाळे विकसित करणे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे.
एमएमआरडीएने नेहमीच विविध संस्थांना परवडणारे व पर्यावरणपूरक कार्यक्रम विकसित करण्यासाठी भागीदारीस प्रोत्साहन दिले आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले.
------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )