ई-सिगारेट ड्रग्ज आहे का?; उच्च न्यायालयाची विचारणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ई-सिगारेट ड्रग्ज आहे की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले.

मुंबई : ई-सिगारेट ड्रग्ज आहे की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले.

गॉडफ्रे फिलिप्स आणि ईझी स्मोक वितरक कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. तसेच राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने सीलबंद केलेले कंपनी व वितरकांचे सामानही परत करण्याचे आदेश दिले. कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. ई-सिगारेट ड्रग्ज नाही. 

या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही खंडपीठाने नमूद केला. पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E Cigarettes is Drugs or Not verify Order by High Court