नवी मुंबईत होणार 28 कोटींची ई-टॉयलेट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबईत वर्षभरात 28 कोटींची ई-टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकीतून ऐराम कंपनीने पुढाकर घेऊन आतापर्यंत शहरात 26 ई-टॉयलेट बांधली आहेत. यातील 20 सर्वांसाठी आणि सहा शी-टॉयलेट आहेत. 

राज्यातील स्वच्छ महापालिकांमध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेचा केंद्रीय मंत्री व्यकय्या नायडू यांनी गौरव केला. राज्यासह देशाच्या पश्‍चिम भागातही नवी मुंबई अव्वल ठरली. स्वच्छता, निटनेटकेपणा व हागणदारीमुक्त शहर यामुळे नवी मुंबईने छाप पाडली आहे. सामाजिक बांधिलकीतून कर्तव्य बजावणाऱ्या कंपन्यांचा यात सिंहाचा वाटा आहे. ई-टॉयलेट बांधणाऱ्या ऐराम कंपनीने महापालिकेला यात मोलाची मदत केली. नागरिकांना प्रवास करताना व शहरात फिरताना अगदी सहज शौचालयाची सुविधा मिळावी यासाठी ऐराम कंपनीने पुढाकार घेऊन शहरात 28 कोटी 46 लाखांची ई-टॉयलेट मोफत बांधण्याचा संकल्प केला आहे. यातील सुमारे 26 टॉयलेट शहराच्या अनेक भागांत व पामबीच रोडकडेला बांधली आहेत. आणखी अशी टॉयलेट बांधण्यात येणार आहेत, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्दीक अहमद यांनी सांगितले. 

Web Title: E-Toilets for 28 crores in Navi Mumbai