
लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे 171 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मुंबई, ता. 26 : लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे 171 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, खर्च 1 हजार 201 कोटी 91 लाख रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात बेस्टची तब्बल 1 हजार 29 कोटी रुपयांची वित्तीय तुट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेले 720 कोटींच्या अनुदानानंतरही उत्पन्न आणि खर्चात 312 कोटी 37 लाख रुपयांची तफावत असल्याने 200 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. महापालिकेकडून मिळालेल्या अनुदानापेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावर बेस्टचा खर्च झाला आहे. या आठ महिन्यात वेतनावर बेस्टचे 736 कोटी 9 लाख रुपये खर्च झाले आहे.
तोट्यात असलेल्या बेस्टला महानगर पालिकेने गेल्या काही वर्षात 2 हजार 500 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. तर, आताही अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, बेस्टकडून या खर्चाचा तपशील सादर करण्याची मागणी स्थायी समितीने केली आहे. त्यानुसार बेस्टने एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या सात महिन्यातील खर्चाचा तपशील सादर केला आहे. यात, बेस्टला अवघे 171 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर खर्च 1 हजार 201 कोटी 91 लाख लाख रुपये झाला. त्यामुळे तुट तब्बल 1 हजार 29 कोटी 99 लाखांची आहे. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुर्वीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बेस्टने 62 कोटी 91 लाख रुपये खर्च केले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात खर्च भागविण्यासाठी प्रत्येक महिन्यात 100 कोटी असे 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पावर आणि त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या सर्व माहितीवर डिसेंबर पहिन्यापासून चर्चा करण्यात येणार आहे.असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर
पालिकेकडून 720 कोटींचे अनुदान :
एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यात पालिकेकडून बेस्टला 720 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. बेस्टला या वर्षात पालिकेकडून 1 हजार 500 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार होते. मात्र, पालिकेचे उत्पन्न घटल्याने बेस्टचे अनुदान 500 कोटी रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात बेस्टला 1 हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून आता पर्यंत 720 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
बेस्टचे उत्पन्न :
बेस्टला प्रवासी वाहतुकीतून 167 कोटी 92 लाखांचे उत्पन्न मिळाले तर इतर मार्गातून 4 कोटीचे असे 171 कोटी 92 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, पालिकेकडून 720 कोटी रुपयांचे अनुदान अशा पध्दतीने एप्रिल ते ऑक्टोबर या काळात बेस्टच्या खात्यात 891 कोटी 92 लाख रुपये जमा झाले.312 कोटी 37 लाख तुट भरुन काढण्यासाठी बेस्टने 200 कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे.
महत्त्वाची बातमी : "दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी"; मुंबई उच्च न्यालयाने याचिका फेटाळली
खर्च असा झाला
( संपादन - सुमित बागुल )
earnings 171 crore expenses one thousand 201 crore best in 1 thousand 29 crore deficit