दिल्ली-महाराष्ट्र हादरणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नासाच्या माहितीनुसार, लवकरच सगळ्यात मोठा भूकंप दिल्लीत येणार आहे. 9.1 रिश्‍टर स्केल इतक्‍या तीव्रतेचा हा भूकंप असेल. त्याचा फटका पंजाब, गुजरात, महाराष्ट्रसह तमिळनाडूपर्यंत बसू शकतो, असेही या व्हिडीओमध्ये आहे. 

मुंबई : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक भविष्यवाणी केलीय... इतिहासात कधीही नोंद न झालेल्या तीव्रतेचा भूकंप दिल्लीत होणार असल्याचा दावा करणारा व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. 7 ते 15 एप्रिलदरम्यान या धक्‍क्‍याने दिल्लीसह महाराष्ट्रही हादरणाऱ्या दाव्यामुळे अनेकांची झोप उडाली; पण ही नासाची भविष्यवाणी खरी आहे का? यामागचे सत्य "सकाळ माध्यम समूहा'च्या "साम वाहिनी'च्या पडताळणीत स्पष्ट झाले. 

नासाच्या माहितीनुसार, लवकरच सगळ्यात मोठा भूकंप दिल्लीत येणार आहे. 9.1 रिश्‍टर स्केल इतक्‍या तीव्रतेचा हा भूकंप असेल. त्याचा फटका पंजाब, गुजरात, महाराष्ट्रसह तमिळनाडूपर्यंत बसू शकतो, असेही या व्हिडीओमध्ये आहे. 
नासाच्या नावाने हा मेसेज व्हायरल होत असल्याने "साम'च्या टीमने नासाची वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे का हे तपासले. त्या वेळी अशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही, हे स्पष्ट झाले.

या पडताळणीचा दुसरा टप्पा म्हणून भूगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश काकडे यांच्याबरोबर संपर्क साधला. काकडे यांनीही या व्हिडीओतील माहिती असत्य असल्याचे सांगितले. त्यामुळे दिल्लीत सगळ्यात मोठा भूकंप येणार ते हे असत्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या व्हिडीओवर कुणीही विश्‍वास ठेवू नका. लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा काही जण प्रयत्न करतात, हेच यामागील सत्य आहे. 

सत्य काय? 
- भूकंपाचे पूर्वानुमान करता येत नाही 
- भूकंपाचे पूर्वानुमान व्यक्त करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही 
- अशा घटनेची वेळ, तारीख सांगता येत नाही 
- त्सुनामी येणार असल्यास अंदाज कळू शकतो  

 
 

Web Title: Earthquake estimated Delhi Maharashtra sakal news