डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्‍के

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

तलासरी : डहाणू आणि तलासरीमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे लागोपाठ तीन धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप 3.3 रिस्टर स्केल इतक्‍या क्षमतेचा असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाने परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले. 

डहाणू तालुक्‍यातील धुंदलवाडी, हळदपाडा, दापचरी, सांसवंद, वरखंडा, वंकास, मोडगाव, तसेच तलासरी तालुक्‍यातील तलासरी, वडवली, कवाडा, वसा, कारजगाव, कुर्झे, सूत्रकार, अनविर, सवरोली, कोचाई, बोरमाळ, उपलाट, आमगाव, आच्छाड, संभा, गिरगाव गीभणी या गावांना भूकंपाचे हादरे बसले. गुजरात राज्यातील उंबरगाव, संजाण, भिलाड, वापी आदी ठिकाणी भूकंपाचे धक्के बसल्याचे तेथील नागरिकांकडून सांगण्यात आले. शनिवारी दुपारी 3.15, 3.18 आणि 3.30 वाजता भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यापूर्वी 6 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.25 वाजता 3.2 रिस्टर स्केल इतक्‍या क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

धुंदलवाडी, दापचरी, हळदपाडा या भागांतील काही घरांच्या भिंतींना यापूर्वीच्या भूकंपात तडे गेले होते. त्यात शनिवारी पुन्हा भूकंपाचे हादरे बसल्याने अनेक घरे कोसळण्याच्या स्थितीत पोचली आहेत. तर वेदांत मेडिकल कॉलेजच्या भागातही भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्याने तेथील कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक तातडीने रुग्णालयाबाहेर पडले होते. मागील दोन महिन्यांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्‍के बसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake shocks again in Dahanu Talasi