तलासरी, डहाणूला भूकंपाचे सात धक्के

Earthquake
Earthquake

तलासरी (जि. पालघर) - तीन महिन्यांपासून वारंवार बसणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्‍यांत बुधवारी पहाटेपासून दिवसभर मध्यम तीव्रतेचे किमान सात धक्के जाणवले.

डहाणू-तलासरी परिसरात पहाटे 3.54 वाजता पहिला धक्का जाणवला. त्यानंतर पहाटे 4.56, सकाळी 10.44; तसेच सकाळी 11.20 वाजता पुन्हा धक्के जाणवले. सकाळी 10.44 वाजता बसलेल्या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्‍टर स्केल होती. याशिवाय अन्य तीन धक्केही जाणवले. दरम्यान, भूकंप होत असलेल्या हळदपाडा परिसरात शिवसेनेतर्फे आठ तंबू उभारले आहेत. सुमारे 400 लोकांना सामावून घेण्याची या तंबूंची क्षमता आहे. शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील धुंदलवाडी आणि हळदवाडा परिसरातील नागरिकांना एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवनावश्‍यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com