Mumbai News : मुंबई नागपूरमध्ये ईडीची छापेमारी; कोट्यवधीची मालमत्ता जप्त

ईडीने मुंबई आणि नागपूरमधील 15 ठिकाणांवर सोमवारी छापेमारी केली
ED raids in Mumbai Nagpur Assets worth crores seized Investment scam crime police
ED raids in Mumbai Nagpur Assets worth crores seized Investment scam crime policeesakal

मुंबई : ईडीने मुंबई आणि नागपूरमधील 15 ठिकाणांवर सोमवारी छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यावधी रुपयांची रक्कम आणि दागिने ईडीने जप्त केलं आहे. गुंतवणूक घोटाळा प्रकरणी ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणात यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.

ED raids in Mumbai Nagpur Assets worth crores seized Investment scam crime police
ED Action : ईडीचा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक! मुंबई, नागपुरात मोठ्या प्रमाणात छापेमारी

ईडीने पंकज मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन या आरोपींनी केलेल्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणी मुंबई, नागपूरमधील 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या. या धाडीत 5.51 कोटी रूपयांचं दागिने आणि 1.21 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीत अनेक महत्वाची कागदपत्रेही ईडीने जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी?

या प्रकरणात मुख्य आरोपी पंकज मेहाडियाने 12 टक्के व्याजाचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पंकज मेहाडियासह त्याची वृद्ध आई प्रेमलता नंदलाल मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन,

ED raids in Mumbai Nagpur Assets worth crores seized Investment scam crime police
"मला ED, CBI द्या २ तासात मोदी-अदानींना अटक करतो" ; आप खासदाराचा दावा

बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता पंकज मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित सुमारे 15 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीत आता मोठी मालमत्ता हाती लागल्याचं समोर आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com