शिक्षण, सुधार समितीसाठी नगरसेविकांचे लॉबिंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - महापालिकेतील सर्वांत महत्त्वाची स्थायी समिती मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनी शिक्षण आणि सुधार समितीचे अध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

मुंबई - महापालिकेतील सर्वांत महत्त्वाची स्थायी समिती मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनी शिक्षण आणि सुधार समितीचे अध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

स्थायी समितीचे अध्यक्षपद आतापर्यंत कधीच शिवसेनेच्या नगरसेविकांना मिळालेले नाही. या समितीसाठी अनेक ज्येष्ठ नगरसेविका प्रयत्नशील होत्या. मात्र, ते मिळण्याची शक्‍यता नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिक्षण व सुधार समितीसाठी लॉबिंग सुरू केले आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेने नगरसेविकांना संधी दिली आहे. मात्र, सुधार समितीवर कधीच नेतृत्व दिले नाही. त्यामुळे ही खुर्ची मिळवण्यासाठी नगरसेविकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, सुधार समितीही त्यांना मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मात्र नगरसेविकेची निवड होऊ शकते. 

सुधार समितीत तीन माजी महापौर 
सुधार समितीत या वेळी शिवसेनेचे तीन माजी महापौर असतील. मिलिंद वैद्य, विशाखा राऊत व श्रद्धा जाधव यांना सुधार समितीवर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर वरळी येथील ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनाही सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना शिक्षण समितीची खुर्ची देण्यात आली आहे. शिक्षण समितीवरील इतर नगरसेविकांमध्ये शीतल म्हात्रे, शुभदा गुडेकर व संध्या दोशी यांचा समावेश आहे. 

Web Title: Education, Committee for corporators lobbying reform