Mumbai News : मुंबईत कंटेनर अंगणवाड्या सुरू; २४९ ठिकाणी मुलांना लाभ मिळणार

जागेची टंचाई असलेल्या मुंबईत कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरु करण्यात आला
education Container Anganwadis start in Mumbai student child bmc
education Container Anganwadis start in Mumbai student child bmcsakal

मुंबई : जागेची टंचाई असलेल्या मुंबईत कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरु करण्यात आला असून आज कांदिवली (पू.) च्या जानुपाडा येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईत २४९ ठिकाणी अशा अंगणवाड्या सुरु केल्या जातील.

education Container Anganwadis start in Mumbai student child bmc
Holi Celebration : होळीला शेणी का जाळतात? काय आहे महत्त्व!

अनोखी संकल्पना असलेला हा कंटेनर अंगणवाडी प्रकल्प मुंबई महापालिका परिसरात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जानुपाडा अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यासाठी अंगणवाडी दत्तक योजनेअंतर्गत भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या इतर सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने या अंगणवाड्यांना दत्तक घेतले आहे. वरळी येथेही लौकरच असा प्रकल्प सुरु होईल.

education Container Anganwadis start in Mumbai student child bmc
Mumbai News : कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा ग्रामस्थांनी केला उघड

जागेची टंचाई असलेल्या मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणारी ‘कंटेनर अंगणवाडी’ ही संकल्पना बालक आणि पालकांसाठी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची महत्त्वाची भूमिका असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

education Container Anganwadis start in Mumbai student child bmc
Mumbai : चित्रकाराच्या रेखाटनामुळे ४५० गुन्हेगारांना बेड्या!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या प्रकल्पामुळे झोपडपट्टी तसेच वस्त्यांमधील बालकांना लाभ होणार असून, या भागातील बाल शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com