...म्हणून मुंबईतील शाळा सुरू ठेवण्याचा संस्थाचालकांचा निर्धार

School
Schoolsakal media

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीवरून (Diwali Festival holiday) मुंबईतील शाळा (Mumbai school), संस्थाचालक, शिक्षक संघटना (teachers union) आणि शिक्षण विभाग आमने सामने उभे टाकले आहे. 28 ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टी शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेले आदेश प्रमाण मानून 30, ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू(school starts) ठेवण्याचा निर्धार शाळा, संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांनी केला आहे.

शिक्षण विभागातील निर्णय प्रक्रियेत समन्वय नसल्याने दिवाळी सुटीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एक परिपत्रक जारी करून दिवाळीची सुट्टी ही 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईतील शाळांनी आपल्याकडील सहामाही परीक्षा आणि त्याचे नियोजन केले होते. त्यातच काल शिक्षण सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिवाळी सुट्टीसाठी नवीन परिपत्रक जारी केल्याने मुंबईत शाळा संकटात सापडल्या आहेत. त्यात परीक्षा आणि त्याचे नियोजन करण्यात आल्याने आम्ही 30 ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार केला असल्याचे संस्थाचालक संघटनेच्या प्रतिनिधिकडून सांगण्यात आले.

मुंबईतील शाळांमध्ये आज विविध विषयांच्या परीक्षा पार पडल्या विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय टंकलेखनाची परीक्षासुद्धा विविध शाळांतील केंद्रांवर होती. त्यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत शाळा सुरू ठेवल्या जाणार आहेत.मात्र यासाठी गोंधळ निर्माण करणाऱ्या शिक्षण विभागाने आपल्याकडून झालेल्या चुकी मध्ये दुरुस्ती करून शाळांना दिलासा देण्याची गरज होती, ती का करण्यात आली नाही असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com