उन्हाळी सुटी फक्त 13 दिवसांची, 1 जानेवारीपासून दुसऱ्या सत्रातील ऑनलाईन लेक्चर सुरु होणार

उन्हाळी सुटी फक्त 13 दिवसांची, 1 जानेवारीपासून दुसऱ्या सत्रातील ऑनलाईन लेक्चर सुरु होणार

मुंबई, ता. 25 : मुंबई विद्यापीठाने अखेर शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार यंदा महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्टीत कपात झाली असून विद्यार्थ्यांना अवघ्या 13 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार आवश्यक शैक्षणिक कालावधीही पूर्ण होत नसल्याची टीकाही शिक्षक संघटना करत आहेत.

विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वच महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाकडे सर्व महाविद्यालयांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुंबई विद्यापीठाने नुकताच आपल्या शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केला आहे. या वेळापत्रकानुसार विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात येत्या नव्या वर्षांत नव्या सत्राचा अभ्यास सुरु केला जाणार आहे. यासाठी महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली असून दुसर्‍या सत्रात ही ऑनलाइन लेक्चरद्वारे विद्यार्थ्यांची वर्ग भरणार आहेत. आर्टस, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ज्यात महाविद्यालयांनी पहिले सत्र 7 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरे सत्र 1 जानेवारी 2021 ते 31 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यानंतर 1 ते 13 जून या कालावधीत उन्हाळी सुटी असेल असेही या वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळापत्रकाच्या आधारे 90 दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होत नसल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे.

असे आहे वेळापत्रक 

  • पहिले सत्र - 7 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020
  • दुसरे सत्र - 1 जानेवारी ते 31 मे 2021
  • उन्हाळी सुट्टी - 1 जून ते13 जून 2021
  • प्रथम वर्षासाठी लागू नाही

इंजिनीअरिंग, एमबीए, विधी अशा व्यावयासायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यामुळे प्रथम वर्षासाठी हे वेळापत्रक लागू होऊ शकणार नाही. यामुळे यासाठी विद्यापीठ स्वतंत्रपणे पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहे का? असा प्रश्नही प्राध्यापक विचारत आहेत.

educational time table for the second semester declared by Mumbai university

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com