मुंबईत तिसऱ्या दिवशीही सीएनजी पुरवठ्यावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

आपत्कालीन मदत कक्ष अनभिज्ञ
ओएनजीसीकडून होणारा पुरवठा पूर्वपदावर कधी येणार, तसेच सीएनजी केंद्रात मिश्रित गॅसची समस्या कधी दूर होणार, याबाबतची कोणतीही माहिती महागनर गॅस लिमिटेडच्या आपत्कालीन मदत कक्षाला नव्हती. 

त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडविरोधात सीएनजी पंपचालक व रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - सीएनजीच्या पाइपलाइनमध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी, सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून, प्रवाशांचेही त्यामुळे हाल होत आहेत.  

उरण येथील ओएनजीसी गॅसप्रक्रिया केंद्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (ता.१६) सहा पंप बंद करण्यात आले होते. याचा परिणाम इतर १३३ पंपांवरसुद्धा दिसून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Effect on CNG Gas Supply in Mumbai