कर्जत-पनवेल लोकलसाठी प्रयत्न सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

पनवेल - पनवेल-कर्जत लोकलचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्‍न लोकसभेत उपस्थित केला, तेव्हा याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले होते, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. 21) येथे पत्रकारांना सांगितले. हार्बर लोकलमधील गर्दी, स्थानकांवरील पाण्याची कमतरता, अस्वच्छता याबाबत रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार बारणे यांनी पनवेल-खारघर असा लोकल प्रवास करून प्रवाशांसोबत संवाद साधला. रेल्वे संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. खासदार बारणे दर मंगळवारी पनवेल व उरणमध्ये येतात. पनवेल शहर शिवसेनेचे शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी लोकल प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल स्थानकाला भेट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास बारणे यांनी पनवेल रेल्वेस्थानकाला भेट दिली. शिवसैनिक आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथे त्यांनी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदारांचा हा नियोजित दौरा असल्यामुळे पनवेल रेल्वेस्थानक चकाचक केले होते. तेथील पाहाणी करून बारणे यांनी सीएसटी लोकलमधून खारघरपर्यंत प्रवास करत थेट प्रवाशांशी संवाद साधला. लोकलच्या वेळा आणि 12 डब्यांची लोकल फलकावर दर्शवून नऊ डब्यांचीच लोकल येत असल्यामुळे होणारी तारांबळ याविषयी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. 

पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात सोमण यांनी बारणे यांना पत्र दिले. खारघरचे उपविभाग प्रमुख चंद्रकांत देवरे यांनी खारघर रेल्वेस्थानकावरील समस्यांबाबत निवेदन दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, पनवेल तालुकाप्रमुख वासुदेव घरत, तालुकासंघटक दीपक निकम, नगरसेवक रमेश गुडेकर, उपविभागप्रमुख मंदार काणे, विभागप्रमुख रवी पडवळ, भरत कल्याणकर, रूपेश पवार, राहुल गोगटे, उबेद पवार, प्रवीण जाधव, युवा सेनेचे पराग मोहिते, नरेश ढाले, यतिन मानकामे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Efforts are on for Karjat-Panvel Local Train