केडीएमटी उपन्न वाढीसाठी कर्मचारी वर्गाने मेहनत करा : प्रकाश पेणकर 

mumbai.jpg
mumbai.jpg

कल्याण : आगामी काळात खासगी ठेकेदार मार्फत केडीएमटी बसेस दुरुस्ती करण्यात येणार असुन, त्यासोबत आगामी वर्षाच्या अंदाज पत्रकात केडीएमटीसाठी पालिका प्रशासनाने भरीव रक्कम तरतुद केली असून त्यामुळे कर्मचारी वर्गाने पगाराची चिंता न करता उपन्न वाढीसाठी मेहनत करा. चोरी करणाऱ्या कर्मचारीच्या पाठीशी मी अथवा संघटना उभी राहणार नसून प्रशासनाने अशा कर्मचारी वर्गाला कठोर कारवाई करावी अशी मागणी मान्यताप्राप्त परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी एका कार्यक्रमात केली .

मान्यताप्राप्त परिवहन कर्मचारी संघटनेची शनिवार ता 22 फेब्रुवारीला केडीएमटी डेपो प्रवेशद्वार जवळ कर्मचारी वर्गाची सभा संपन्न झाली. यावेळी संघटना अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या उपस्थितीत काही संघटनाच्या कर्मचारी वर्गाने प्रवेश केला. यावेळी अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले. पगार वाढ झाली असून पालिकेच्या आगामी अंदाज पत्रकात केडीएमटीसाठी भरीव तरतूद केल्याप्रकरणी माहिती देत पेणकर म्हणाले, ''आगामी काळात खासगी ठेकेदार मार्फत बसेस दुरुस्ती करण्यात येणार असल्याने अनेक बसेस कर्मचारी वर्गाच्या हातात येईल. त्यामुळे आता मेहनत करा आणि कर्मचारी वर्गाने चिंता करण्याची गरज नाही. पगार वेळेवर होईल, मात्र इमानदारीने काम करा. जे कर्मचारी तिकीटाच्या पैश्याचा अपहार, चोऱ्या करतात त्यांच्या पाठीशी मी अथवा माझी संघटना नाही. अशा कर्मचारी वर्गाच्या पाठीमागे माझ्या संघटनेच्या पदाधिकारी वर्गाने उभे राहिल्यास त्याला संघटनेमधून बाहेर काढला जाईल असा सज्जड दम देत केडीएमटी प्रशासन करत असलेल्या कारवाईचे समर्थन करत, चोऱ्या करणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रशासनाने घरचा रस्ता दाखवा अशी मागणी यावेळी पेणकर यांनी केली आहे .



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com