अंड्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने बाजारातील अंड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंधेरी आणि गोरेगाव परिसरातील दुकानांतील अंड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

मुंबई शहर, उपनगर आणि डोंबिवलीतील बाजारात प्लास्टिकची अंडी विक्रीस आल्याची जोरदार चर्चा व्हॉटसऍपवर झाली. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. अंधेरी आणि गोरेगाव येथील विक्रेत्यांकडून अंड्यांचे काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच हाती येईल, असे एफडीएचे सहायक आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.

उन्हाळ्यामुळे अंडी खराब होत आहेत; परंतु प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची शक्‍यता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

Web Title: egg sample gives to laboratory