esakal | 'ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, आमच्या आंदोलनला यश' - आचार्य तुषार भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

'ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, आमच्या आंदोलनला यश' - आचार्य तुषार भोसले

आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी राज्य सरकारच्या मंदिरे खुली करण्याबाबतच्या निर्णयावावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, आमच्या आंदोलनला यश' - आचार्य तुषार भोसले

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करीत होते. आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी राज्य सरकारच्या मंदिरे खुली करण्याबाबतच्या निर्णयावावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून तसेच भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले होते. राज्यात मद्यालये सुरू आणि मंदिरालये बंद असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. परंतु पाडव्यापासून म्हणजेच सोमवार पासून मंदिरे सुरू करणार असल्याने भोसले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

हेही वाचा - 'उशीरा सूचलेले शहानपण'! मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजप नेत्याची प्रतिक्रीया

गेल्या चार महिण्यांपासून मंदिरे खुली करण्याबाबत जे आंदोलन आम्ही उभे केले आहे. त्या आंदोलनाला यश आले आहे. हिंदूत्वाचा विजय झाला आहे. दिवाळी नंतर मंदिरे उघडू असे म्हणणाऱ्या ठाकरे सरकारला दिवाळीतच मंदिरे उघडावी लागली आहेत. सरकारला पाडव्याच्या मुहूर्तावरच मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी भगवंताने दिली. हिंदूत्वाचा विजय झाला आणि सरकारचा अहंकार गळून पडला आहे. हीच साधू संतांची आणि भगवंताची ताकद आहे.असे तुषार भोसले म्हणाले. 

पाडव्यापासून राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणालेत की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

हेही वाचा - वीज कर्मचाऱ्यांना तत्वतः बोनस जाहीर; विश्वासात न घेतल्याने संप होणारच 

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असं ही मुख्यमंत्री म्हणालेत. 

loading image
go to top