esakal | मुंबई : मलबार हिल येथे 8 मुलं खाडीत बुडाली; परिसरात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

malbar hills

मुंबई : मलबार हिल येथे 8 मुलं खाडीत बुडाली

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई : मलबार हिलच्या (malbar hill) पीडीपी गार्डन मागील खाडीत ८ मुलं पोहण्यासाठी गेली असता ती बुडाल्याची घटना सोमवारी (ता.४) सायंकाळी घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस मदतकार्यासह घटनास्थळी दाखल झाले.

८ मुलं पोहण्यासाठी गेली

८ ही मुलं मित्र असून सोमवारी संध्याकाळच्या वेळेस पोहण्यासाठी मलबार हिल येथील पीडीपी गार्डन मागील खाडीत उतरले होते. दरम्यान, ८ मुले बुडाल्याने घटना उघडकीस आली. मुलांचा शोध स्थानिक तरुणांनी घेतला. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी खाडीत बुडालेल्या ६ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नितीन गडकरींचे नाशिक, ठाणेकरांना गिफ्ट! वाहनधारकांना दिलासा

हेही वाचा: गजबजलेल्या शाळेत प्रार्थनेचे सूर ऐकताच पाणावले शिक्षकांचे डोळे

loading image
go to top