मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प ८०९ कोटींचा; ८५ कोटी वाढले

Mumbai University
Mumbai UniversitySakal media

मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८०९ कोटींचा अर्थसंकल्प (budget) आज मांडला. यंदा अर्थसंकल्पात तब्बल ७३ कोटी ८८ लाख तूट दाखवण्यात आली; तर गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची (Eighty five crore rupees more) वाढ करण्यात आली. याबाबतची माहिती विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी प्रदीप कामथेकर (Pradip Kamthekar) यांनी दिली.

Mumbai University
मुंबई : गिरणी कामगारांची आर्त हाक; एक लाख ५९ कामगार घराच्या प्रतीक्षेत

अर्थसंकल्पात डिजिटल युनिव्हर्सिटी, ग्रॅफिटायझेशन मशीन फॉर मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलेटर सेंटर, डिजिटल ग्रंथालय, इंटर्न्स ॲण्ड ॲप्रेंटिस, सेंटर फॉर एक्सलन्स इन थॅरोटिकल ॲण्ड कम्प्युटेशनल सायन्स, स्पोर्टस् कॉम्प्लेक्सची स्थापना, विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण आदींसाठी मोठी तरतूद करण्यात आली.

तसेच ॲकॅडमिक ऑडिट पोर्टल फॅसिलिटी टू स्टेट युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र स्टेट, मराठी युनिकोड सॉफ्टवेअर ॲण्ड ट्रेनिंग, पानिणी चेअर, स्वामी विवेकानंद चेअर आदींसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर आणि रायगड येथील विद्यापीठ उपपरिसरातील परीक्षांसाठी पायाभूत सुविधांसाठी ९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Mumbai University
कर्नाटकातील परिस्थिती मुंबईत; मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास नकार

निधी असतानाही शून्य खर्च

गतवर्षीच्या निधीचा वापर न झाल्याने बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्रासाठी पुन्हा नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी अधिक एक कोटीची तरतूद करण्यात आली. गेल्या वर्षभरात या दोन्हीही केंद्रांवर फारसा निधी खर्च झाला नसल्याचे चित्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी गतवर्षी दोन कोटींची तरतूद केली होती; मात्र कोविडमुळे या केंद्राचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही, तसेच निधीचा तुटवडाही आहे. त्यामुळे आणखी निधी मिळाल्यास बांधकाम सुरू करता येईल, अशी माहिती कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com