पालघर जिल्ह्यातील ८० टक्के बोटी किनाऱ्याला; मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम

Boats at beach
Boats at beachgoogle

वसई : डिझेलचे वाढलेले दर (Diesel rate), उन्हाळ्यात माशांची कमी झालेली पैदास यामुळे मासेमारीसाठी (Fishing) समुद्रात जाणाऱ्या बोटींपैकी ८० टक्के बोटी किनाऱ्यावर (Boats at beach) लागल्या आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर (Impact on business) परिणाम झाला आहे. त्यात पापलेट (Pomfret) दुर्मिळ झाला असल्याने त्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे पापलेटप्रेमी खवय्यांना जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खिशाला अधिक भार द्यावा लागणार आहे.

Boats at beach
कल्याण-मुरबाड रेल्वे दृष्टीपथात; रेल्वे प्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी

पालघर जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, मस्त्यबीज संपदाही मोठ्या प्रमाणात आहे. पापलेट, बोंबिल, मांदेली, कोळंबी, कोता, घोळ, सुरमई, पकवट, वाघूळ हलवा, दाढा, रावस अशा माशांना नागरिकांची अधिक मागणी असते. पालघर जिल्ह्यात डहाणू, सातपाटी, अर्नाळा, नायगाव आदी ठिकाणी १२०० हून अधिक बोटीतून मासेमारी केली जाते. समुद्रात मासेमारीसाठी कवीची, दालदा, ट्रॉलिंग व पर्ससीन नेट अशा चार पद्धतींचा वापर केला जातो. पालघर सातपाटी येथील दालदा फिशिंग पापलेट चवीला उत्तम असल्याने त्याला नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात असते; परंतु सद्यस्थितीत पापलेट कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे भावदेखील दुपटीने वाढले आहेत.

पापलेटप्रमाणेच अन्य माशांचे दरही वाढले आहेत. कमी प्रमाणात मासे मिळत असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी २० टक्के बोटी जात आहेत. एप्रिलपर्यंत हा परिणाम जाणवणार असल्याचे बोलले जात आहे. बोटी बंद असल्याने मजूर व मासेमारीशी संबंधित असणाऱ्या व्यवसायाला याची आर्थिक झळ बसली आहे. एकीकडे कोरोना, नैसर्गिक आपत्ती, समुद्रात घोंघावणारे वादळ व त्यात माशांची आवक कमी होत असल्याने मच्छीमार बांधवांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे.

Boats at beach
अलिबाग : डंपिग ग्राऊंड , कचरा मुक्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

सध्या समुद्रात मासेमारीसाठी बोटी कमी व किनाऱ्यावर अधिक आहेत. डिझेलने शंभरी पार केली आहे. अशातच बाहेरच्या बोटींचे अतिक्रमण होत असते. त्यातच समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी माशांचे दर वाढले आहेत.
- विनोद पाटील, जिल्हा अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती.

माशाचे वाढलेले दर

मासे आताचे दर पूर्वीचे दर
पापलेट - ११०० ते १२००
सुरमई - १२००
कोळंबी - ६००
दाढा - ८००
करंदी - ३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com