खडसेंना लोकायुक्तांची "क्‍लीन चीट'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

मुंबई - महाराष्ट्राचे लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना त्यांचे स्वीय सहायक गजानन पाटील याच्या लाचमागणी प्रकरणात "क्‍लीन चीट‘ देत या प्रकरणाची फाइल बंद करण्याचे आदेश दिले. 

मंत्रालयाच्या आवारात 30 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने खडसे यांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांना अटक केली होती. या प्रकरणासहित भोसरी येथील एमआयडीसीचा प्लॉट खरेदी प्रकरणामध्ये खडसे अडकल्याने त्यांना आपल्या महसूल मंत्रिपदासह 12 खात्यांचा राजीनामा द्यावा लागला होता. 

या प्रकरणातील तक्रारदार व भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी 27 मे रोजी लोकायुक्तांपुढे आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आज लोकायुक्तांनी खडसे यांना "क्‍लीन चीट‘ देत या प्रकरणाच्या फाइल बंद करण्याचे आदेश दिले. 
 
याप्रकरणी तक्रारदार व बांधकाम व्यावसायिक रमेश जाधव व गजानन पाटील यांच्यामध्ये झालेल्या 12 संभाषणांची रेकॉर्डिंग लोकायुक्तांसमोर सादर करण्यात आली; पण या संभाषणानुसार खडसे यांनी थेट लाच स्वीकारली, असा अर्थ काढला जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या फाइल बंद करण्यात याव्यात, असे लोकायुक्तांनी सांगितले. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात खडसे यांना क्‍लीन चिट मिळेल व ते या खडतर अग्निपरिक्षेत पास होतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी पथकानेही गजानन पाटील लाचमागणी प्रकरणात क्‍लीन चिट दिली आहे. लोकायुक्तांनी दिलेल्या अहवालात खडसे यांच्यावर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत नसून यामध्ये कोणत्याही पद्धतीने खडसे यांनी लाच मागितल्याचे सिद्ध होत नाही. या कारणास्तव या प्रकरणाच्या फाइल बंद करण्यात याव्यात, असे नमूद केले आहे. 

Web Title: Eknath Khadse gets clean chit