'घोटाळे बाहेर काढल्याने खडसेंना बदनाम करण्याचा डाव '

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - विरोधी पक्षात असताना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले. याचा बदला घेण्यासाठी भाजपमधील एक मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बांधकाम व्यावसायिक एकत्रित आले आहेत. ते हेमंत गावंडे यांना पुढे करून खडसेंना बदनाम करत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकतें रवींद्र बऱ्हाटे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

भोसरी येथील जमिनीबाबत हेमंत गावंडे यांनी एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गावंडे हे प्रसारमाध्यमांना कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध नसल्याचे सांगत आहेत; मात्र ते विविध पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप बऱ्हाटे यांनी केला. गावंडे यांच्या व्हीजन प्रॉपर्टीज या बांधकाम संस्थेच्या बॅंक खात्यामध्ये 2011 मध्ये जयराज डेव्हलपर्स यांच्या खात्यातून दोन कोटी रुपये तसेच अमिता अशोक चव्हाण यांच्या खात्यातून दोन कोटी व सिंहगड टेक्‍निकल इन्स्टिट्यूट यांच्या खात्यातून 55 लाख रुपये व एक कोटी 45 लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. ही रक्कम गावंडे यांनी सरकारी शेतकी कॉलेजचे स्वत:च्या नावे खरेदीखत लिहून घेण्याकरता वापरली असल्याचा आरोपही बऱ्हाटे यांनी केला. 

गावंडे यांच्या बॅंक खात्यात माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नीच्या खात्यातून देण्यात आलेली रक्कम तसेच आदर्श जमीन घोटाळ्यात अशोक चव्हाण यांच्या सासू व मेव्हणीला सदनिका विकत घेण्याकरता कर्ज देणारे जयंत शहा व मालो शहा यांच्याकडून कोट्यवधी रुपये रक्कम आली आहे. यासह नोटाबंदीनंतर तीन कोटी 75 लाख रक्कम गावंडे यांना कोणी आणि का पुरवली याची कारणे शोधण्याकरता आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या वेळी बऱ्हाटे यांनी केली. सत्तेत नसताना खडसे यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले. याचा बदला घेण्यासाठी काही विकसक, भाजपमधील एक मंत्री आणि इतर पक्षांचे नेते त्यांच्यावर आरोप करत असल्याचेही बऱ्हाटे या वेळी म्हणाले. 

Web Title: eknath khadse issue