निवडणूक आयोगाने वरळीतून पकडली चार कोटींची रक्कम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

प्रचाराच्या तोफा तोफा थंडावल्या आहेत. अशातच आता मुंबईतील वरळीमधून तब्बल चार कोटींची रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी मतदार संघातून ही रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. निवडणूक आयोगाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीतून चार करोडची रक्कम जप्त करण्यात आली.

प्राथमिक माहितीच्या आधारे ही रक्कम बँकेची असल्याची कळतंय. दरम्यान, याबाबतची माहिती IT विभागाला कळवण्यात आली आहे.  दरम्यान, पुढील तपासणी करून निवडणूक आयोग पुढील कारवाई करणार आहे.  

वरळी मतदार संघ शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. कारण या मतदार संघातून पहिले ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

WebTitle : Election Commission seized Rs 4 crores unaccounted cash in Worli assembly constituency

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission seized Rs 4 crores unaccounted cash in Worli assembly constituency